बारामती(दि१५) बारामतीमध्ये कोरोना रुग्ण संख्या सध्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे. आज बारामतीमध्ये  81 रूग्णांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह  आले आहेत.मागील आठ दहा दिवसांपूर्वी बारामतीमध्ये शंभराच्या पटीत रुग्ण सापडत होते.त्यामुळे प्रशासनाने बारामतीमध्ये जनता कर्फ्यू लागू केला होता याचा परिणाम सध्या पहायला मिळत असून रुग्णांची संख्या सध्या कमी होताना दिसत आहे . त्यामुळे प्रशासनाने सात दिवसांचा जनता कर्फ्यू काल चौदा दिवसांवर वाढवला आहे.  
कालचे (14/09/20) एकूण rt-pcr 166 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते.  यातील एकूण पॉझिटिव्ह  22 तर प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. कालचे एकूण 206 एंटीजन नमुने  तपासणीसाठी घेण्यात आले होते . यापैकी    एकूण पॉझिटिव्ह-59  आले आहेत.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण  22 + 59=81 झाले आहेत . यामध्ये शहरातील 47 व ग्रामीण भागातील 34 रुग्ण आहेत. बारामतीची एकूण रूग्णसंख्या-2194 झाली असून बारामतीतील एकूण बरे झालेले रुग्ण- 1143 झाले आहेत. तसेच एकूण मृत्यू-- 56 झाले आहेत. 
तसेच काल पणदरे, माळेगाव व गुणवडी येथे ऍक्टिव्ह सर्वे (घरोघरी जाऊन तपासणी) करण्यात आला होता, त्यामध्ये एकूण 332 संशयित रुग्ण आढळून आले होते त्यांची त्याच ठिकाणी एंटीजेन तपासणी केली असता त्यापैकी 52 रूग्ण पॉझिटिव आढळून आलेले आहेत त्यामुळे बारामतीची रुग्ण संख्या एकूण 2246 झालेली आहे. अशी माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे .

Post a Comment

أحدث أقدم