बारामती(दि१६) बारामतीमध्ये कोरोना रुग्ण संख्या सध्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे. आज बारामतीमध्ये  70 रूग्णांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह  आले आहेत.मागील पंधरा दिवसांपूर्वी बारामतीमध्ये शंभराच्या पटीत रुग्ण सापडत होते.त्यामुळे प्रशासनाने बारामतीमध्ये जनता कर्फ्यू लागू केला होता याचा परिणाम सध्या पहायला मिळत असून रुग्णांची संख्या सध्या कमी होताना दिसत आहे . त्यामुळे प्रशासनाने सात दिवसांचा जनता कर्फ्यू काल चौदा दिवसांवर वाढवला आहे.  
कालचे (15/09/20) एकूण rt-pcr 265 नमुने घेण्यात आले होते यापैकी एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 34 आले आहेत तर प्रतीक्षेत 52 आहेत.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01 आला आहे. तसेच कालचे एकूण एंटीजन 146 नमुने घेतले होते.  यापैकी एकूण पॉझिटिव्ह-36 आले आहेत .  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 34 + 36=70 झाली आहे. यामध्ये शहरातील 33 व ग्रामीण भागातील 37 रुग्ण आहेत. आता बारामतीची एकूण रूग्णसंख्या-2264  झाली असून एकूण बरे झालेले रुग्ण 1164 झाले अ‍ाहेत. तर एकूण मृत्यू 58 झाले आहेत.अशी माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे .

Post a Comment

Previous Post Next Post