बारामती(दि१७) बारामतीमध्ये कोरोना रुग्ण संख्येने  आज शंभरी पार केली आहे. आज बारामतीमध्ये  121 रूग्णांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह  आले आहेत.मागील पंधरा दिवसांपूर्वी बारामतीमध्ये शंभराच्या पटीत रुग्ण सापडत होते.त्यामुळे प्रशासनाने बारामतीमध्ये जनता कर्फ्यू लागू केला होता याचा परिणाम थोडा फार पहायला मिळाला.  त्यामुळे प्रशासनाने सात दिवसांचा जनता कर्फ्यू चौदा दिवसांवर वाढवला आहे. मात्र प्रशासनाकडून बारामती शहरांमध्ये घरोघरी केलेल्या तपासणीत 18 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने  ही संख्या वाढली आहे.
दिनांक 15/9/20 रोजीचे प्रतीक्षेत असलेल्या 52 नमुन्यांपैकी एकूण  20 नमुने पॉझिटिव आलेले आहेत. तसेच कालचे (16/09/20) एकूण rt-pcr 222नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यापैकी एकूण पॉझिटिव्ह 64 तर प्रतीक्षेत 11 आहेत.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण 06 आहे.कालचे एकूण एंटीजन 148नमुने तपासणीसाठी घेतले होते.यापैकी एकूण पॉझिटिव्ह 19 आले आहेत. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 20+64+19=103. तसेच काल बारामती शहरांमध्ये करण्यात आलेल्या ऍक्टिव्ह सर्वे मधून 18 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत, त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीची एकूण रुग्ण संख्या  103+18=121 झाली असून यामध्ये शहरातील 55 व ग्रामीण भागातील 66 रुग्ण आहेत. बारामतीची एकूण रूग्णसंख्या 2385 झाली असून एकूण बरे झालेले रुग्णांची संख्या 1191 झाली आहे. तसेच एकूण मृत्यू 59 झाले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी सांगितले आहे . 

Post a Comment

أحدث أقدم