बाराती: बारामती मध्ये आज १५ रुग्णांचा व खाजगी प्रयोग शाळेत २३ रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. बारामती मध्ये एकूण 69 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 60 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून नऊ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत प्राप्त झालेल्या अहवालापैकी बारामती शहरातील नऊ व ग्रामीण भागातील 6 असे 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 44 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे व इतर तालुक्यातील एक जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे पॉझिटिव आलेल्यांमध्ये टी सी कॉलेज येथील तीन जण, कल्याणी नगर तांदूळवाडी येथील दोन जण, देसाई इस्टेट येथील पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कातील दोन जण, तांबे नगर येथील एक रुग्ण व न्हावी गल्ली कसबा येथील एक रुग्ण असे शहरातील नऊ व मेडद येथील दोन रुग्ण व माळेगाव येथील एक रुग्ण, जळगाव क प येथील दोन रुग्ण, ढेकळवाडी येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील एक रुग्ण असे एकूण पंधरा रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत तसेच बारामती येथील खाजगी प्रयोगशाळेमध्ये एकूण 88 अॅंटीजेन तपासणी करण्यात आल्या होत्या त्यामध्ये बारामती तालुक्यातील 23 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत त्यामध्ये बारामती शहरातील 12 व ग्रामीण भागातील अकरा अशा रुग्णांचा समावेश आहे त्यामुळे काल दिवसभरात एकूण 15 rt-pcr व 23 अॅंटीजेनअसे एकूण 38 रुग्ण पॉझिटिव आढळून आलेले आहेत त्यामुळे बारामतीतील रुग्ण संख्या 385 झाली आहे.
बारामतीमध्ये शासकीय रुग्णालयात १५ तर खाजगी प्रयोग शाळेतील २३ रीपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह. सा.बारामती दर्पण
baramati darpan
0
تعليقات
إرسال تعليق