बारामती : बारामती मधील दिनांक 19/ 8/ 20 रोजी रोजी घेतलेल्या नमुन्यांपैकी प्रतीक्षेत असलेले 38  जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी माळेगाव येथील चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरित 34 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत त्यामुळे 19/ 8 /20रोजी घेतलेल्या 135 नमुन्यांपैकी एकूण कालचे चार व आजचे 4 असे आठ जणांचा अहवाल rt-pcr पॉझिटिव आलेला आहे व बारामतीची एकूण रुग्ण संख्या 470 झाली आहे तसेच काल दिनांक 20 /8/ 20 रोजी एकूण 138 जणांचा अहवाल rt-pcr तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 74 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 64 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत
तसेच काल बारामतीतील खाजगी प्रयोग शाळेमध्ये घेण्यात आलेल्या शहरातील तीन जणांचे अहवाल रात्री उशिरा एंटीजेन पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यामुळे रुग्ण संख्या 473 झाली आहे.अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे .

Post a Comment

Previous Post Next Post