वडगाव निंबाळकर (दि२८) : बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याला स्मार्ट पोलीस ठाणे हा मानाचा पुरस्कार मिळाला त्या निमित्त बारामती तालुका मराठी पत्रकार संघाचे मा.अध्यक्ष हेमंत गडकरी, ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सचिन वाघ, भारतीय पत्रकार महासंघाचे दादासाहेब लोणकर यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे कार्यक्रम सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांची भेट घेऊन त्यांना व त्यांच्या स्टाफला शुभेच्छा दिल्या. या शिवाय या पोलिस ठाण्यात यापूर्वी कार्य करणारे या मानांकनासाठी प्रयत्न करणारे श्री चवरे साहेब, बडवे साहेब, पाटील साहेब,शिंदे साहेब यांचे ही अभिनंदन केले.
वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारल्यापासून कार्यक्षेत्रातील सर्व समाजातील घटकांशी सलोख्याचे संबंध ठेवले आहेत. कोरोनाच्या काळात लांडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे ची टीम अतिशय चोखपणे काम पार पाडत आहे. यावेळी बोलताना लांडे साहेब म्हणले की वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील कुणीही खाजगी सावकाराच्या भीती सावटाखाली असेल तर त्यांनी न घाबरता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल तसेच तक्रार येणाऱ्या प्रत्येक खाजगी सावकार विरोधात कडक कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. व लोकांनी न घाबरता पोलीस ठाण्याकडे अशा सावकारांची तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी केले.
Post a Comment