बारामती : दि:१५ : बारामतीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येत आहे. आज बारा रुग्णांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे.  काल बारामती मध्ये 93 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यामध्ये 70 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून अकरा जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे आणि बारा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत . त्यामध्ये बारामती शहरातील भोई गल्ली येथील 2 म्हाडा कॉलनीतील एक ख्रिश्चन कॉलनीतील एक एमआयडीसी बारामती येथील एक रुग्ण असे पाच व पवईमाळ येथील एकाच कुटुंबातील चार रुग्ण मळद येथील एक रुग्ण झारगडवाडी वाडी येथील रुग्णाच्या संपर्कातील एक रुग्ण व खांडज मधील एक रुग्ण असे ग्रामीण भागातील सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
प्रशासन सर्वोतपरी प्रयत्न करत असून नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करावे व महत्त्वाचे काम असेल तरच घराच्या बाहेर पडावे असे आव्हान आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post