बारामती : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांचे वाढदिवसानिमित्त
बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीतर्फे होमिओपॅथी गोळ्या ( संजिवन चिकित्सा हयुमा -१) व
मास्कचे वाटप आणि हमाल संघटना बारामती यांचे तर्फे हमाल, मापाडी व श्रमिक घटकांना
किराणा-धान्य किट वाटपाचा कार्यक्रम गुरूवार दि. १३ रोजी बारामती तालुका
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजीनाना होळकर यांचे शुभहस्ते संपन्न झाला.
राज्यात कोरोना विषाणुचा प्रादर्भाव वाढत असल्याने त्याचा परिणाम बाजार समित्यांवर
झाला होत आहे. प्रामुख्याने बाजार समित्यांमधील काम करणारे श्रमिक घटकांवर मोठ्या
प्रमाणात आर्थिक परिणाम झाला आहे. त्यामुळे श्रमजिवी घटकांचा कौटुंबिक विचार करता घर
चालविणे ही अवघड व अडचणीचे झाले आहे. त्याचा विचार करता हमाल पंचायतीचे उपाध्यक्ष
शंकर सरक यांनी स्वखर्चाने हमाल मापाडी व अमिक घटकांसाठी ५ किलो गहु, साखर १
किलो, गोडेतेल १ किलो व एक मास्क असे १००० किराणा-धान्य किट तयार केले. त्याचे वाटप
आज येथे करणेत आले. सदर उपक्रम हा स्तुत्य असल्याचे सांगुन सर्वांनी कोरोना बाबत सतर्क
रहावे. तसेच बाजार आवार आवारात काम करताना सोशल डिस्टनिंगचे पालन करावे, मास्क
वापरावेत असे मत संभाजीनाना होळकर यांनी मांडले.
यावेळी बाजार समितीचे सभापती अनिल खलाटे यांनी आवारातील बाजार घटकांनी
कोरोना बाबत काळजी घ्यावी असे सांगुन सर्वांनी आपले शारिरीक तंदुस्तीकडे लक्ष द्यावे व
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे गुणधर्म असलेले होमिओपॅथी गोळ्या संजिवन चिकित्सा
युमा-१ वाटप बाजार समितीने प्रत्येक एक बॉटल दिली आहे. सकस असा आहाराचा समावेश
करावा असे मत व्यक्त केले.
यावेळी पंचायत समितीचे सभापती सौ. निता बारवकर, दुध संघाचे चेअरमन संदीप
जगताप, पोपटराव तुपे, महावीर शहा, माथाडी बोर्डाचे मेंगडेसाहेब, बाजार समितीचे
उपसभापती बाळासो पोमणे, सदस्य रमेश गोफणे, अनिल हिवरकर, शौकत कोतवाल, वसंत
गावडे, पुरूषोत्तम गदादे, नितीन सरक, प्रताप सातव, बाळासो फराटे, बाजार समितीचे सचिव
अरविंद जगताप तसेच यार्ड मधील व्यापारी, हमाल, मापाडी व श्रमजिवी घटक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश गोफणे यांनी केले तर आभार पुरूषोत्तम गदादे यांनी मानले
Post a Comment