बारामती:३० बारामतीमध्ये आज २८ रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे .काल बारामती मध्ये एकूण 186 जणांचे नमुने rt-pcr तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 137 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून अठरा जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत तसेच बारामती शहरातील सतरा व ग्रामीण भागातील 11 अशा 28 जणांचा अहवाल rt-pcr पॉझिटिव आलेला असून इंदापूर व पुरंदर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. बारामतीतील रुग्णसंख्या 776 झालेले आहे तसेच काल रात्री बारामतीतील खाजगी दवाखान्यामध्ये उपचार सुरू असलेल्या शहरातील दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
बारामतीमध्ये आज २८ कोरोना रुग्णांची भर तर दोन रुग्णांचा मृत्यू. सा.बारामती दर्पण
baramati darpan
0
Comments
Post a Comment