बारामती : बारामतीमध्ये आज दहा जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. काल बारामती मध्ये एकूण 73 स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 71 जणांचा अहवाल प्राप्त झाला आहे व दोन जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे यामध्ये एकूण 59 जणांचे अहवाल निगेटिव्ह आला असून बारामतीमधील दहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे व इतर जिल्ह्यातील दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे, बारामती मधील पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बारामती शहरातील 5 जणांचा व ग्रामीण भागातील पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे शहरामध्ये देसाई इस्टेट मधील एक, सुहास नगर मधील एक, खंडोबा नगर मधील एक,पाटस रोडवरील एक व बारामती शहरांमध्ये एक असे पाच व वंजारवाडी एमआयडीसीतील एक, जळगाव सुपे मधील एक माळेगाव बुद्रुक मधील 1 व मळद येथील बारामती मध्ये कंपनीत काम करणारा एक रुग्ण व डोरलेवाडी तील रुग्णाच्या संपर्कातील एक असे 5 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत बारामतीची एकूण रुग्ण संख्या 175 झाली आहे.अशी माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे.
बारामतीत आज दहा जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह:रुग्णसंख्या १७५ . सा.बारामती दर्पण
baramati darpan
0
تعليقات
إرسال تعليق