मोरगाव:  पुरंदर तालुक्यातील नाझरे  धरण काल सकाळी दहा वाजता  85 टक्के भरून आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास  पूर्ण क्षमतेने भरले आहे  .  सकाळी सहा वाजलेपासुन धरणातून सातशे-आठशे क्यूसेस  पाण्याचा विसर्ग कऱ्हा  नदी  होत असल्याने नदीला  पूर आला आहे.
 नाझरे  धरण आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर  सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास  २६  स्वयंचलित दरवाजातून क-हा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे . आज मोरगाव परिसरात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कऱ्हा नदी पात्रात पाणी पोहचले आहे . मोरगाव येथील काशी समान पवित्र समजले जाणारे पात्रातील गणेश कुंड पुरामुळे पाण्याखाली गेले आहे .
नदी काठच्या गावातील ग्रामपंचायतींनी काल दि १५ रोजीच दवंडीद्वारे सतर्कतेचा ईशारा दिला आहे . गेल्या वर्षीही  14 ऑगस्ट 2019 रोजी  नाझरे धरण पूर्ण क्षमतेने भरले होते . नदीला आलेल्या पुरामुळे नदी काठच्या विहरींची पाणी क्षमता वाढणार आहे 

Post a Comment

Previous Post Next Post