बारामती : बारामतीमध्ये आणखी सतरा करोना रुग्णांची भर पडली आहे .काल बारामती मध्ये 76 जणांचे नमुने rt-pcr तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 63 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून शहरातील सहा व व तालुक्यातील सात असे तेरा जणांचा अहवाल rt-pcr पॉझिटिव आलेला आहे तसेच बारामती मध्ये आज खाजगी प्रयोगशाळेमध्ये एकूण 23 नमुने एंटीजेन तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी बारामती शहरातील तीन व कटफळ येथील एक असे चार रुग्णांचा अहवाल एंटीजन पॉझिटिव्ह आलेला आहे त्यामुळे आज दिवसभरात एकूण सतरा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून बारामतीची रुग्ण संख्या 520 झाली आहे व बरे झालेल्यांची संख्या 255 झालेली आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये मूर्टी येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील सहाजण व माळेगाव बुद्रुक येथील एक जण तसेच बारामती शहरातील जुना मोरगाव रोड येथील दोन रुग्ण, आमराई येथील एक रुग्ण,तांदूळवाडी येथील एक रुग्ण, इंदापूर येथील एक रुग्ण ,अंबिका नगर येथील एक रुग्ण, हरिकृपा नगर येथील एक रुग्ण तसेच रिलायन्स टॉवर शेजारी ढोर गल्ली येथील एक रुग्ण व शहरातील एक रुग्ण असे रुग्ण आढळून आले आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे .
बारामतीत आणखी सतरा कोरोना रुग्णांची भर. सा.बारामती दर्पण
baramati darpan
0
Comments
Post a Comment