बारामती : बारामतीमध्ये आज बत्तीस जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे . बारामती मध्ये एकूण 82 नमुने rt-pcr तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी एकूण पंधरा जणांचा अहवाल प्रतीक्षेत असून 67 जणांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे तसेच काल संध्याकाळनंतर व आज दिवसभरात बारामतीतील खाजगी प्रयोगशाळेमध्ये एकूण 98 नमुने एंटीजेन तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 74 जणांचा अहवाल निगेटिव आला असून बारामती शहरातील 18 व ग्रामीण भागातील 6 अशा 24 जणांचा अहवाल एंटीजेन पॉझिटिव्ह आलेला आहे तसेच आज दिवसभरात ग्रामीण रुग्णालय रूई येथे शासकीय एंटीजेन तपासणीसाठी 41 जणांचे नमुने घेण्यात आले होते त्यापैकी ग्रामीण भागातील 6 व बारामती शहरातील 2 अशा आठ जणांचा अहवाल एंटीजेन पॉझिटिव्ह आलेला आहे त्यामुळे चोवीस तासातील एकूण रुग्णसंख्या 24+8= 32 झालेली आहे व बारामतीची एकूण रुग्ण संख्या 614 झालेली आहे तसेच काल रात्री अंजनगाव येथील एका रुग्णाचा उपचार सुरू असताना ग्रामीण रुग्णालय रूई येथे मृत्यू झालेला आहे त्यामुळे मृत्यूंची संख्या 30 झालेली आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिले आहे .
बारामतीत आज ३२ जणांना कोरोना: एका रुग्णाचा मृत्यू . सा.बारामती दर्पण
baramati darpan
0
Comments
Post a Comment