सोमेश्वरनगर :   ज्युबिलंट सायन्स या कंपनीने वाघळवाडी येथील शेतकऱ्यांना एक हजार झाडे दिली. या झाडे वाटपाचा आणि वृक्षारोपणचा कार्यक्रम ज्युबिलंटचे उपाध्यक्ष सतीश भट यांच्या हस्ते पार पडला.
ज्युबिलंट भारतीया फाऊंडेशन कृषी मित्र प्रकल्प या प्रकल्पाच्या माध्यमातून कंपनीने शेतकऱ्याची निवड केली. यामध्ये निवडण्यात आलेल्या शेतकऱ्यांना एक हजार झाडे उपलब्ध करून दिली आहेत. यामध्ये केसर आंबा, पेरू, सिताफळ, नारळ, लिंबू ,शेवगा अशी रोपे देण्यात आली आहेत. ज्युबिलंटच्या कृषी मित्र प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत झाडे देण्यात आली असून झाडांच्या वाढीसाठी सुद्धा ज्युबिलंट मदत करणार आहे. 
या कार्यक्रमासाठी राजेंद्र राघव , निशांत फड, इसाक मुजावर, सूर्यकांत पाटील, अजय ढगे हे ज्युबिलंटचे अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमा प्रसंगी सतीश भट म्हणाले की, शेतकऱ्यांना झाडांच्या माध्यमातून उत्पन्न मिळावे. त्याचा शेतकऱ्यांना फायदा व्हावा हा आमचा उद्देश आहे. झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारी शेतकऱ्याची आहे. शाळेसाठी तसेच वाघळवाडी गावासाठी आम्ही पुढील काळात मदत करू.
या कार्यक्रमावेळी उपसरपंच जितेंद्र सकुंडे, ग्रामपंचायत सदस्य हेमंत गायकवाड, प्रसिध्द व्यावसायिक महेश सत्तेगिरी, श्रीरंग मोहिते, चैतन्य सावंत, तुषार सकुंडे, चेतन सकुंडे, संभाजी भुजबळ, विकास सावंत, आनंदा लेंबे, सतीश सावंत, भरत सकुंडे, चैतन्य तुळसे, ओंकार अलगुडे आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post