को-हाळे बु।(दि११) : वीर धरण सध्या 95 टक्के भरले असून नीरा नदीपात्रात सुमारे 800 क्यसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढल्यास हा विसर्ग वाढविण्यात येईल अशी माहिती वीर धरणाचे अभियंता विजय नलवडे यांनी दिली.
भाटघर धरण 69 %तर नीरा-देवघर धरण 56 %तर गुंजवणी धरण 87% टक्के भरले आहे वीर धरणातील येवा पाच हजार क्युसेस इतका आहे त्यामुळे आज दुपारी चार वाजता वीर धरणातून नीरा नदी पात्रात सुमारे प्रति सेकंद 800 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे त्यामुळे नीरा नदी काठावरील पुणे व सातारा जिल्ह्यातील गावांना सावधानतेचा इशारा असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस पडल्यास हा विसर्ग वाढू शकतो.
वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जून-जुलै महिन्यात मागील वर्षीच्या तुलनेत पाऊस नसल्याने धरणात अपेक्षित पाणी साठा नव्हता त्यामुळे नदीच्या विसर्गावर सिंचनासाठी अवलंबून असणारे शेतकरी हवालदिल झाले होते.ऑगस्ट महिन्यात उशिरा का होईना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने आता नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरवात झाल्याने सध्या तरी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
Post a Comment