को-हाळे बुद्रुक: दि१७ : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र बापू भगत  यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मागील दहा दिवसांपूर्वी निधन झाले.त्या पार्श्वभूमीवर  आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी भगत कुटुंबियांच्या घरी भेट देऊन सांत्वन केले.
   भगत बापू यांनी सोमेश्वर कारखान्याचे ३२ वर्ष संचालक पद व १० वर्ष उपाध्यक्षपद भूषवले होते. तसेच काकडे गटाकडून सोमेश्वर कारखाना पवार यांच्या ताब्यात देण्यात बापूंचा मोलाचा वाटा होता. आता पर्यंत सोमेश्वर कारखान्यात बापुंचा शब्द म्हणजे अंतिम शब्द मानला जात होता. भगत बापु म्हणजे एक फिरते न्यायालय अशी भावनाच लोकांच्या मनात झाली होती. पवार साहेबांनी सुध्दा आज भगत कुटुंबियांचे सांत्वन करताना बापूंच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी भगत कुटुंबियातील सोमेश्वर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक सुनिल तात्या भगत, विलास भगत , बान्सीलाल भगत, संजय भगत, डॉ. यशवंत भगत, यांच्यासह भगत कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post