को-हाळे बुद्रुक :  थोपटेवाडी येथे  कै.रामचंद्र बापू भगत उर्फ भगत बापू यांना थोपटेवाडी ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कै. भगत बापू यांचे दहा दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या पार्श्वभूमीवर थोपटेवाडी  गावात शुक्रवार दिनांक १७ जुलै रोजी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी त्यांचे पुतणे सुनील (तात्या)भगत उपस्थित होते.बापुंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित ग्रामस्थांनी श्रद्धांजली वाहिली. भगत बापू यांचे थोपटेवाडी येथील अनेक कुटुंबाशी जिव्हाळ्याचे संबंध होते.त्यांची शेती थोपटेवाडी गावात असल्याने मजुर वर्गासह  शेतक-यांच्या  ते परीचयाचे होते. यावेळी अनेकांनी बापूंच्या आठवणींना उजाळा दिला.

1 تعليقات

إرسال تعليق

أحدث أقدم