माळेगाव: पणदरे येथिल युवा उद्योजक व राजलक्ष्मी डेअरी चे मालक राजेंद्र सुदामराव जगताप यांनी  सामाजिक बांधिलकी जपत राज्यलक्ष्मी डेअरीच्या वतीने पणदरे परीसरात मोफत ५०० मास्कचे वाटप केले आहे. पणदरे येथिल बँक कर्मचारी ,पोलीस कर्मचारी, वहान चालक, दुकाणदार विक्रेते, सामान्य नागरीक यांना या मास्कचे वाटप करण्यात आले.  जर्मनी येथे असलेल्या आपल्या भाचीच्या वाढदिवसानिमित्त हा  स्तुत्य उपक्रम राबवला असल्याची माहिती जगताप यांनी साप्ताहिक बारामती  दर्पणशी बोलताना दिली. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post