मोरगाव: लोणी भापकर ( ता. बारामती )येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप रामचंद्र कडाळे यांना त्यांच्या भावकीतील लोकांनी दुसऱ्या गावातील लोकांना बोलावून जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे.
   याबाबत वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे
या घटनेची सविस्तर हकीकत अशी की संदीप कडाळे व उत्तम कडाळे यांच्यात सन 2012 पासून जमिनीचा वाद असून त्याबाबतचा दिवाणी दावा सुरू आहे. 20 जून रोजी उत्तम कडाळे यांच्या शेतात ट्रॅक्टर काम करत असताना पद्मा कडाळे यांचा भाचा सिद्धार्थ उर्फ बबलू गायकवाड यांनी आमच्या शेतीचा बांध कोरला. यावर माझा भाऊ अमोल  याने विचारपूस केली असता त्या ला अश्लील शेरेबाजी करत शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी पद्मनाथ उत्तम कडाळे, सिद्धार्थ उर्फ बबलू राजेंद्र गायकवाड, धीरज सुरेश आवाडे, योगेश सुरेश आवाडे, प्रताप राजेंद्र कडाळे, दादासो उत्तम कडाळे,अजित राजेंद्र कडाळे यांनी संदीप दगडाने व काठीने  यांना जबर मारहाण केली. मारहाण करताना त्यांनी दगड व काठीचा वापर केला. याबाबत संदीप रामचंद्र कडाळे यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस हवालदार बापू साहेब मत्रे करत आहेत.
...........
सदर आरोपीवर गुन्हा दाखल असून सुद्धा सदर आरोपी मोकाट फिरत आहेत तसेच  मला गावात आडवी गाडी मारत आहेत व मला उद्देशून शेरेबाजी करत आहेत. सदर आरोपी मुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला असून सदर आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी फिर्यादी संदीप रामचंद्र कडाळे यांनी केली असून सदर आरोपींना अटक न झाल्यास ते उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे दाद मागणार आहेत.

Post a Comment

أحدث أقدم