वडगाव निंबाळकर (दि२५):    वडगाव निंबाळकर पोलिसांनी कठीणपूल येथे दुचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाई करत 4400 रुपयांचा दंड वसूल केला आहे. बारामतीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस  वाढत आहे,असे असताना बारामतीतील लॉकडाउन काहीअंशी शिथिल करण्यात आल्याने  बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी चारचाकीमध्ये तीन व्यक्ती व दुचाकीवर एकाच व्यक्तीला प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. मात्र नागरिकांकडून नियमांचे कोणतेच पालन होत नसल्याने वडगाव पोलिसांनी कारवाईला आता सुरूवात केली आहे. याचाच भाग म्हणून आज को-हाळे बु। नजिक कठीणपुल येथे ही कारवाई करण्यात आली. यावेळी वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासंदर्भातही सुचना देण्यात आल्या व भविष्यात ही कारवाई आणखी कडक करण्यात येणार असल्याचे वाहतुक पोलिसांकडून सांगण्यात आले . वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस बी.पी.पानसरे, सागर वाघमोडे, व होमगार्ड यांनी ही कारवाई केली.

Post a Comment

أحدث أقدم