को-हाळे बुद्रुक:बारामती तालुक्यातील थोपटेवाडी गावातील अंगणवाडी  मदतनीस व आशा वर्कर महिलेने नोकरी करत बारावी परीक्षेत यश मिळवले आहे.सारीका जगताप असे या महिलेचे नाव असून त्यांनी वयाच्या ३६ व्या वर्षी बारावीत ६३ %टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे.सारीका जगताप यांना शिक्षणाची पहिल्यापासूनच आवड होती. माहेरी शिक्षणाची इच्छा पूर्ण होण्याआधीच त्यांचा विवाह झाला मात्र विवाहानंतरही त्यांची शिक्षणाची इच्छा मात्र कायम राहीली.काही कालांतराने त्यांना अंगणवाडी मदतनीस व आशा वर्कर म्हणून नोकरी लागली,कुटुंबीयांकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे त्या आजही नोकरी करत कुटुंबाची सर्व जबाबदारी पार पाडत आहेत .तसेच  २०१९मध्ये त्यांना बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आदर्श अंगणवाडी मदतनीस पुरस्कार ही मिळाला आहे .याबरोबरच पंणदरे विभागातील सर्वोत्कृष्ट आशा वर्कर पुरस्कारही सलग तीन वर्षे त्यांनी मिळवला आहे.नोकरी करत कुटुंबाची जबाबदारी सांभाळून १२ वी परीक्षेत सारिका जगताप यांनी उत्तम यश मिळविल्याने त्यांच्यावर परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.एवढेच नव्हे तर त्यांच्या मुलांनीही आई प्रमाणे आपल्या शिक्षणात प्रगतीचा आलेख उंचावत ठेवला आहे. त्यांची मुलगी वृषाली  जगताप ही माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये डिप्लोमाच्या तिसऱ्या वर्षाला असून सलग दोन वर्ष ती तिसऱ्या क्रमांकाने पास झाली आहे तर मुलगा दिनेश जगताप हा चौथी इयत्तेत स्कॉलरशीपमध्ये बोर्डात आला असून तो आता १० वी मध्ये आहे. पती अनिल जगताप यांच्या प्रोत्साहानामुळेच मी एवढे  करू शकले त्यामुळे आपल्या यशात पतीचा मोठा वाटा असल्याचे सारीका जगताप आवर्जुन  सांगतात.

Post a Comment

أحدث أقدم