प्रतिनिधी - सूरज देवकाते
बारामती -
बारामती तालुक्यातील माळेगाव येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून ९ लाख ७० हजार ४० रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून , ३३ जणांवर तालुका पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .


उपविभागीय पोलीस अधिकारी . नारायण शिरगावकर यांना मिळाले गुप्त बातमीवरुन , बारामती तालुका पोलीस ठाणे हददीत रमाबाई नगर माळेगाव (ता .बारामती) येथे  रमन गायकवाड क्लबमालक व इतर हे एका बंगल्यात बेकायदा बिगरपरवाना पत्त्याचा क्लब चालवून पैशावर जुगाराचा खेळ खेळत असल्याची माहिती मिळून आली . सदर ठिकाणी छापा टाकला असता क्लब मालक रमन गायकवाड यांच्या सह  , रोख रक्कम , ७ दुचाकी व १ चारचाकी गाडया , टेबल , खुर्चा व जुगाराचे साहीत्य असे एकूण ९ , ७०,०४० रुपयेचा मुददेमाल व ३३ आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले आहे . सदर आरोपींविरुध्द बारामती तालुका पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायदयाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
सदरची कारवाई  अपर पोलीस अधीक्षक. मिलींद मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी  नारायण शिरगावकर व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गोसावी ,  सुरेश भोई , रमेश केकाण , आप्पा दराडे , वैभव साळवे , गणेश काटकर , राहूल लाळगे , दत्तात्रय गवळी तसेच आर.सी.पी. पथक क्रमांक ३ मधील श्रीकांत गोसावी , रज्जाक मणेरी , आबा जाधव , सचिन दरेकर , अमोल चितकुटे , सागर कोरडे , सुजीत शिंदे , प्रियंका झणझणे , मेघा इंगळे , मंगल बनसोडे यांनी केलेली आहे .

Post a Comment

أحدث أقدم