माळेगाव प्रतिनिधी- 
      माळेगावात भाजी विक्रेते,दुकानदार,सलुन व्यावसायिक,सामान्य नागरिक हे मास्क न वापरता खरेदी विक्री करत असुन अशा बेफिकीरीने वागणा-या नागरिकांना दंड आकारण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे.
  बारामती येथे काल कोरोनाचे सहा रुग्ण सापडले आहेत. बारामती व माळेगाव येथील नागरिक सातत्याने ये-जा करतात. माळेगाव मधील अनेक भाजी विक्रेते,दुकानदार,सलुन व्यावसायिक व ग्रामस्थ हे मास्क वापरत नाही.त्यामुळे कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. 
     भाजी विक्रेते,दुकानदार,सलुन व्यावसायिक हे सॅनीटाईजर वापरत नाही,ग्राहकांना देखील सॅनीटाईजर करत नाहीत. सर्वांची कृती कोरोनाला निमंत्रण देणारी आहे.
     या पार्श्वभूमीवर सरपंच जयदीप तावरे,उपसरपंच अजित तांबोळी व ग्रामविकास अधिकारी संजय साळुंखे यांनी एक परिपत्रक काढले आहे.  जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार मास्क वापरणे बंधनकारक आहे. याचे उल्लंघन केल्यास पाचशे रुपये दंड आकारला जावा अशी सुचना दिली आहे.
     या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास किंवा थुंकल्याच पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे.याची अंमलबजावणी कडक केली जाणार आहे.
  
 ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील मुख्य चौकात फ्लेक्स उभारुन मास्क वापरावा,न वापरल्यास व थुंकल्यास पाचशे रुपये दंड केला जाईल अशी सुचना केली आहे.या सूचनांचे पालन करावे. 
                          जयदीप तावरे- सरपंच 
  

Post a Comment

أحدث أقدم