बारामती : बारामतीमधील काल घेतलेल्या नमुने पैकी एकूण ५९ स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवले होते त्यापैकी ४२ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून १७ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत प्राप्त झालेल्या ४२ अहवाल पैकी ११ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत त्यामध्ये काल पॉझिटिव्ह आलेल्या गुरुकुल सोसायटी शिव नगर येथील रुग्णाच्या संपर्कातील तीन जणांचा तसेच जामदार रोड कसबा येथील रुग्णाच्या संपर्कातील तीन जणांचा व मुक्ती अपार्टमेंट कसबा येथील एक जणांचा, खंडोबानगर दत्त मंदिराजवळ येथील दोन जणांचा, मारवाड पेठ येथील एक जणांचा व ख्रिश्चन कॉलनीतील एक जणांचा असे ११अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत.अशी माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिले आहे .
धक्कादायक... बारामतीत कोरोनाचे आणखी अकरा रुग्ण पॉझिटिव्ह. सा.बारामती दर्पण
baramati darpan
0
Comments
Post a Comment