सोमेश्वरनगर ( वार्ताहर )
बारामती तालुका आजी माजी सैनिक संघ ,सोमेश्वरनगर येथे कारगील युद्धातील प्रत्यक्ष सहभाग असलेले जवान बाळासाहेब रासकर व निवृत्त हवालदार बी .एल. जगताप यांचा सत्कार करुन कारगील दिन साजरा करणेत आला .
वडगाव निबाळकर पोलीस स्टेशन चे स पो नि सोमनाथ लांडे यांच्या हस्ते शहिद जवानाना मानवंदना देण्यात आली .सैनिक संघटनेच्या तक्रार निवारण कमीटी चे अध्यक्ष व माजी सैनिक गणेश आळंदीकर यानी प्रास्ताविक मधे कारगील युद्धात जवानानी दिलेल्या लढ्याबद्द्ल माहीती दिली .युद्धातील सैनिक रासकर व जगताप यानी त्यांचे अनुभव सांगीतले मान्यवरांचे स्वागत संघटनेचे कार्याध्यक्ष अनिल शिंदे यानी केले . मान्यवरांचा सत्कार बाळासाहेब गायकवाड ,राजाभाऊ थोपटे ई नी केला .यावेळी तालुक्यातील अनेक जवान उपस्थीत होते .
लॉकडावुन च्या पार्श्वभूमी वर सोशल डिस्टनसींग चे पालन करीत प्रत्येकाला सॅनिटायझर देणेत आले .करंजेपुल चे सरपंच वैभव गायकवाड कारखाना संचालक विशाल गायकवाड ई मान्यवर यावेळी हजर होते .
Post a Comment