माळेगाव  प्रतिनिधी-      गायरानातुन मुरुम चोरी करताना दोन ट्रॅक्टर ट्राॅली जप्त केल्याची माहिती मंडलाधिकारी स्वाती गायकवाड यांनी दिली.    माळेगाव येथील इंजिनीअरिंग काॅलेज जवळ दगडखाणी परिसरातील गायरानातुन राजरोसपणे काही मुरुम माफिया मुरुम चोरी करत होते. काही जागरुक नागरिकांनी बारामतीचे तहसीलदार विजय पाटिल यांना फोनवरून माहिती दिली. त्यांनी तातडीने मंडलाधिकारी स्वाती गायकवाड  व तलाठी प्रमिला लोखंडे यांना कारवाईच्या सुचना दिल्या.
      सदर माहितीच्या आधारे गायरानात धाड टाकून मुरुम चोरी करणारे गणेश जाधव व अभिजीत गोफणे  रा.माळेगाव बु यांचे ट्रॅक्टर व ट्राॅली जप्त करून माळेगाव पोलिस दूरक्षेत्राचे काॅन्स्टेबल निखील जाधव यांच्या ताब्यात देण्यात आले. 

Post a Comment

أحدث أقدم