माळेगाव प्रतिनिधी-
माळेगाव येथे दिलिप शामराव खरात वय- 50 या निराधार अविवाहित इसमाचा अपघात घडला.तो गावात भिक मागुन उपजीविका करत होता.अपघात होऊन देखील जवळ पास चार तास पडुन होता. मात्र एकाही माणसाला माणुसकीचा पाझर फुटला नाही.सदरचा अपघात इंजिनीअरिंग काॅलेज जवळ दि.29 रोजी रात्री साडेसात वाजता घडला.
साधारण रात्री साडे दहा वाजता सामाजिक कार्यकर्ते आवुराजे भोसले यांना फोन आला की दिलीपचा अपघात झाला असुन तो एका जागी पडुन आहे. क्षणाचा विचार न करता आवुराजे यांनी अपघातग्रस्त दिलीपची भेट घेतली. त्याची विचारपूस करत पहाणी केली असता दोन्ही पायांना जबरी मार लागला होता.
यावेळी त्यांनी पोलिस काॅन्स्टेबल निखील जाधव यांना अपघाताची माहिती देऊन रुग्णवाहिका तातडीने पाहिजे अशी मागणी केली. रुग्णवाहिका आली पण चालक अपघातग्रस्त दिलीपला घेऊन जाण्यासाठी नकार दिला.
पोलिस काॅन्स्टेबल निखील जाधव यांनी सांगताच तो चालक तयार झाला. अखेर अपघातग्रस्त दिलीपला रुग्णवाहिकेतून अॅड.विक्रांत डेंगळे,विकास खोमणे यांनी सरकारी दवाखान्यात बारामती येथे दाखल केले.
मात्र या दवाखान्यातील डाॅक्टर हे दिलिपला हात लावत नव्हते. ते उपचार करण्यासाठी टाळाटाळ करत होते. यावेळी आवुराजे भोसले यांनी सदर प्रकार चित्रीकरण करुन प्रसारीत करण्याचा इशारा दिला. अखेर डाॅक्टरांनी नमते घेत उपचार सुरू केला. अपघातग्रस्त दिलिपचा एक पाय मोडला असुन त्यांचेवर प्लास्टर केले आहे. तर दुस-या पायावर जखम झाली आहे. अपघातग्रस्त दिलिपची प्रकृती चांगली असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.
إرسال تعليق