माळेगाव प्रतिनिधी-
बारामती तालुक्यातील जैनकवाडीतील पवार वस्तीमधे मेजवानीसाठी चिंकारा जातीच्या हरणाची शिकार करण्यात आली असुन काही शेतक-यांनी जागृता दाखवल्याने संबधित शिका-याचा डाव फसला.या शिका-याचे चित्रिकरण केले आहे.दरम्यान या शिका-यांवर कारवाई करावी अशी मागणी पशुप्रेमींनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,तालुक्याच्या जैनकवाडीतील पवार वस्तीमधे सोमवार (दि. 8) रोजी सकाळी अकरा वाजता काही शेतकरी शेतातील कामे करत असताना चिंकारा जातीच्या हरणाचा पाठलाग शिकारी कुत्रा करत होता. या कुत्र्याने त्या हरणास ठार मारले. यावेळी एक शिकारी तिथे आला.त्यास काही शेतक-यांनी विचारणा केली. संबधित शिकारी व शेतक-यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी शिका-याने शेतक-यास धमकी दिली.घटनास्थळी अनेक शेतकरी गोळा झाल्याने शिकारी पळुन गेला.याच ठिकाणी दुर अंतरावर काही शिकारी जाळे टाकुन तयार होते. मात्र सदर घटनेचे मोबाईलमधे चित्रिकरण केल्याने आरोपी पकडणे शक्य होणार आहे.
दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपवनरक्षक लक्ष्मी,सहायक वनरक्षक वैभव भालेराव,बारामतीचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे,वनपाल टि.जे.जराड,वनरक्षक कवितके,वनमजुर काळंगे यांनी भेट देऊन संबधित शिका-यावर वन पशु हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.
إرسال تعليق