को-हाळे बु। : ज्येष्ठ पत्रकार  शहाजी काका शिंदे यांचे आज दुख:द निधन झाले.  त्यांनी सामाजीक  कार्यकर्ते आण्णा हजारे यांचेसमवेत  भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष पदी काम केले होते. तसेच त्यांचे शिक्षण डी फार्मसी झाले होते. करंजेपुल येथे त्यांचे गुलाब शेवंती म्हणुन मेडीकल होते मात्र सामाजीक कार्याची आवड असल्याने त्यानी प्रथम साप्ताहिक राळेगणसिद्धी सुरु केले त्यातुन जिल्ह्यातील बातम्या ते लिहित बारामती पासुन जुन्नर ,मंचर ,राळेगण सिद्धी पर्यंतचा प्रवास ते मोटारसायकलवरच करीत असत व त्यांनी गावोगावी कार्यकर्त्याना भेटुन मोठे संघटन केले होते.साप्ताहिक राळेगण सिद्धी नंतर त्यानी साप्ताहिक ज्ञानरेष नावाचे साप्ताहिक काढले त्यानंतर गेली ४ वर्ष पासुन त्यानी साप्ताहिक सोमेश्वर प्राईड साप्ताहिक चालवले.अतिशय निर्व्यसनी असा पत्रकार म्हणुन ते परिचित होते. त्यानी परिसरातील सामाजीक कार्यकर्त्याना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी वेगेवेगळ्या पुरस्काराने सन्मानित केले. स्वत: ची शेती  घरदार असुन शेती करण्यात त्यानी रस न घेता सामाजीक कार्याची आवड त्याना स्वस्थ बसु देत नव्हती.त्यांनी वृद्धाश्रम काढुन देखील अनेक अनाथ वृद्धांची सेवा केली. निसर्गरम्य परिसर करुन वृद्धांची सेवा करीत स्वामी समर्थ मंदीर बांधले तेथे ही त्यानी अनेक उपक्रम राबविले.
     अतिशय धावपळ करणारे व्यक्तीमत्व म्हणुन शहाजी काका शिंदे हे व्यक्तीमत्व परिचीत होते.  सर्व अधिकारी वर्गाशी त्यांचा खुप सलोखा होता. सध्याच्या  खर्चाच्या युगात जाहीरातीशिवाय वर्तमानपत्रे, साप्ताहिक चालवणे अवघड असताना देखील काही मित्र परिवाराच्या सहकार्याने त्यांनी साप्ताहिक सोमेश्वर प्राईडची मशाल तेवत ठेवली होती.
       तसेच पत्रकारीता, सामाजीक कार्य ,वृद्ध सेवा अशा विविध माध्यमातून त्यानी सोमेश्वर चे नाव सर्वदुर पसरवले होते.
अशा या जेष्ठ पत्रकारास साप्ताहिक बारामती दर्पण परीवाराच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

Post a Comment

أحدث أقدم