सचिन वाघ.
को-हाळे बु:(दि२४): को-हाळे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जयश्रीताई संजय धापटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान सरपंच अश्विन ताई गुळुमकर यांनी आपल्या कार्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या सरपंच पदाची आज निवड करण्यात आली यावेळी जयश्री धापटे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी सोमेश्वर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक सुनील (तात्या )भगत, अश्विनीताई गुळुमकर, मोहन भगत , डी जी माळशिकारे ,संजय धापटे,शाम(काका) खोमणे,सुदिप माळशिकारे, शैलाताई भगत, उमाजी खोमणे,भाग्यवान चव्हाण, यांच्यासह नागरिक उपस्थित होते.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी रवी पारधी व गावकामगार तलाठी ए.ए.भगत यांनी काम पाहिले.को-हाळे बुद्रुक ग्रामपंचातीवर सुनील (तात्या)भगत यांच्या नेतृत्वाखाली सिद्धेश्वर ग्रामविकास गाव पॅनलचे निर्विवाद वर्चस्व असून गावातील अनेक विकासकामे या पाच वर्षांत मार्गी लागली आहेत.यावेळी नवनिर्वाचित सरपंच जयश्रीताई धापटे यांनी उपस्थितांचे आभार मानले तसेच सुनील(तात्या) भगत यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात गावातील राहिलेली कामे मार्गी लावणार असून सध्या गावामध्ये असलेल्या दोन्ही आरोह प्लॅंन्ट मधून आजपासून सर्व नागरीकांना मोफत पाणी दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.सरपंचपदी निवड होताच सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत पाण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
Post a Comment