बारामती : गावटी पिस्टल बाळगल्या प्रकरणी राजेंद्र भंडलकर(रा.को-हाळे बु)व प्रतिक शिंदे (बारामती )या दोघांना बारामती शहर पोलिसांनी अटक अटक केली आहे.सविस्तर माहिती अशी की बारामती शहर पोलिस स्टेशन हद्दीत डी.बी स्टाफ पेट्रोलिंग करत असताना दुचाकीवर एक युवक संशयितरित्या फिरत असल्याचे या पथकाचे लक्षात आल. त्यांनी त्यास हटकले मात्र हा युवक नीरा बारामती रोडने गाडी न थांबवता भरधाव वेगाने निघून गेला.पोलिसांनी पाठलाग केला असता निरा रोड म्हसोबा मंदिरा पाठीमागे आपली मोटारसायकल सोडून पळून जात असताना त्याला पोलिसांनी पकडून त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी पिस्टल सापडला असून त्याचे नाव राजेंद्र सर्जेराव भंडलकर राहणार को-हाळे बुद्रुक असे आहे.त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता हा पिस्टल त्याने प्रतीक भालचंद्र शिंदे रा. इंदापूर रोड हरिकृपा नगर,ता.बारामती यांच्याकडून घेतले असल्याची कबुली दिली आहे .पोलिसांनी त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता एक गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे सापडली आहेत.असा एक लाख साठ हजारांचा माल जप्त केला आहे. तसेच त्यांच्यावर भा. द. वि. कलम २६९ २७० १८८ सह साथीचे रोग प्रति. अधि. १८९७ चे क- १२३ भारतीय हत्यार कायदा कलम ५,२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी मा.अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर ,पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलिस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले,योगेश शेलार,स.फौजदार संदीपान माळीपोलीस नाईक शिताप ,राजेश गायकवाड ,सिद्धेश पाटील, पोपट कोकाटे, सुहास लाटणे ,अंकुश दळवी ,दशरत इंगवले, अजित राऊत, योगेश कुलकर्णी ,यांच्या पथकाने ही कारवाई केली .
गावठी पिस्टल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक. सा.बारामती दर्पण
baramati darpan
0
Comments
Post a Comment