वडगाव निंबाळकर : वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीतील मौजे मानाजीनगर ता.बारामती,जि.पुणे गावचे हद्दीत जहागीरदारवस्ती येथे नीरा डावा कॅनॉल मध्ये एक अंदाजे 55 ते 60 वर्ष वयोगटातील अनोळखी पुरुष जातीचे प्रेत पाण्यात तरंगत असताना मिळून आले आहे, तरी सदर प्रेताचे वर्णन खालील प्रमाणे आहे.
एक अनोळखी इसम,
वय अंदाजे 55 ते 60 वर्ष,
दाढी पांढरी झालेली,
दोन्ही डोळे, नाक, अर्धे कपाळ जलचर प्राण्यांनी खाल्लेले दिसत असून पांढरा रंगाचा शर्ट व पायजमा पूर्ण कुजलेला आहे अशी वर्णन असलेली व्यक्ती  आपल्या पोलीस स्टेशन हद्दीमधून किंवा आपले गावचे हद्दीतून मिसिंग असले बाबत अथवा काही माहिती उपलब्ध असलेस आपण तात्काळ सदर बाबत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे खालील संपर्क क्रमांक वर फोन करून माहिती द्यावी.
02112 - 272133
श्री.सोमनाथ लांडे 
(सहा.पो निरी.)(वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन) मो. नंबर-7038828855
एस.एस.कवितके पोलीस उपनिरीक्षक मो.नं. 8805982252

Post a Comment

Previous Post Next Post