मुरूम येथे तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या..
 सोमेश्वरनगर - हेमंत गडकरी
मुरूम येथील तळवणीनगर येथे राहणाऱ्या एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
    संतोष बाबुराव घोरपडे (वय.३१) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव असून तो आपल्या पत्नी व मुलीसह मुरूम येथे राहतो. त्याच्या मृत्यूबाबत मयताचा भाऊ राजू बाबुराव घोरपडे यांनी करंजे पूल पोलीस दुरक्षेत्रात खबर दिली आहे. मयत तरुणाला दारू पिण्याचे व्यसन असल्याची माहिती मिळत असून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला असून पुढील तपास वडगाव निंबाळकरचे पोलीस करत आहेत

Post a Comment

أحدث أقدم