बारामती - अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील चौंडी ता.जामखेड या गावी माणकोजी शिंदे कुटुंबात झाला आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्राचा प्राथमिक व माध्यमिक अभासक्रमात समावेश करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दौंड तालुका पक्षनिरीक्षक बापुराव सोलनकर यांनी महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या कडे केली आहे
महाराष्ट्र शासनाने इयत्ता ३री ते १२वीच्या वयोगटातील बालसंस्कारक्षम असतात त्यामुळे शालेय अभ्यासक्रमातील थोर व्यक्तींच्या जीवन चारित्रद्वारे बालकांवर देशभक्तीचे संस्कार घडू शकतात. जगाच्या इतिहासात इंदौर च्या प्रशासकीय महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी २९ वर्षाचा आदर्श राज्यकारभार करणाऱ्या एकमेव महिला राज्यकर्त्या आहेत. त्यांनी राज्यात शेतिविकास,जलद न्यायदान, आदर्श प्रशासन, तसेच त्यांनी मंदिर, मशीद, चर्च इत्यादी धर्म स्थळे ची दर्जेदार कामे केल्यामुळे आजही अहिल्यादेवीं चे नाव घेतले जाते तसेच अहिल्यादेवी होळकर यांनी विविध समाज उपयोगी कार्य केले त्यांच्या प्रशासनाबद्घल व त्यांच्या कार्याची पुढील पिढीला माहिती मिळावी तसेच स्त्री राज्यकर्त्यांचाही सन्मान व्हावा या करिता शालेय अभ्यासक्रमा द्वारे माहिती देणे गरजेचे आहे
إرسال تعليق