माळेगाव प्रतिनिधी-
नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेली माळेगाव खुर्द ता बारामती येथील श्री यमाई देवीची यात्रा रद्द करण्यात आली असुन इतिहासात प्रथमच यात्रा रद्द झाली आहे.
माळेगाव खुर्द ता बारामती येथे श्री यमाई देवीचे पुरातन मंदीर आहे.नवसाला पावणारी देवी अशी ख्याती आहे.दरवर्षी वैशाखी पोर्णिमेला यात्रा असते.तालुक्यातील हि शेवटची यात्रा असते.या यात्रेत दरवर्षी ग्रामस्थ हे नातेवाईकांना,पाहुण्या रावळ्यांना मोठ्या प्रमाणात मासांहार करतात.त्यामुळे गावात मोठी गर्दी असते.
मात्र कोरोनामुळे हि यात्रा रद्द केली आहे.याच सोबत मानाच्या काट्यांची मिरवणुक देखील रद्द करण्यात आली आहे.एकंदरीत कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे हि यात्रा रद्द केली आहे.
إرسال تعليق