माळेगाव प्रतिनिधी- 
     गौतम बुद्ध जयंती निमित्त आनंदी फौंडेशनच्या वतिने बारामती,को-हाळे व माळेगाव येथील गोरगरिबांना व परप्रांतियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
       सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या आनंदी फौंडेशनच्या वतिने तथागत भगवान गौतम बुद्ध याची जयंती विधायक उपक्रमाने साजरी केली.कामाच्या निमित्ताने बारामती तालुक्यातील अनेक गावात झारखंड,छत्तीसगड,बिहार,राजस्थान,दिल्ली आदी भागातील मजुर काम करत आहेत.
       सध्या कोरोनामुळे हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.त्यांना या अडचणीतुन बाहेर काढण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे.बारामती येथील सुर्यनगरी,गालिंदेनगर,माळेगाव व को-हाळ्यातील विटभट्टी मजुरांना  अत्यावश्यक वस्तु ( गहु,तांदूळ,डाळ,साखर,मसाला,साबण) वाटप करण्यात आले.
     आनंदी फौंडेशनच्या वतिने अध्यक्ष गणेश गोंडे ,उपाध्यक्ष विकास साळुंखे,दादा गोंडे,रुपेश साळुंखे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. सामाजिक कर्तव्य म्हणून कोणी ही उपाशी पोटी राहु नये यासाठी हे वाटप करण्यात आले अशी माहिती गणेश गोंडे यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post