माळेगाव प्रतिनिधी- 
     तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी सांगितलेल्या पंचशील व अष्टांग मार्गाचे अनुकरण केल्यास मानवी जिवणाचे कल्याण होईल असे प्रतिपादन सरपंच जयदीप तावरे यांनी केले. सोशल डिस्टन्सींचे पालन करत जयंतीनिमित्त पुजापाठ कार्यक्रम संपन्न झाला.
  माळेगाव येथील बौध्दविहारात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन सरपंच जयदीप तावरे व उपसरपंच अजित तांबोळी यांनी केले.यावेळी विजय भोसले यांनी धम्मवंदना व पुजा पाठ घेतला.
 यावेळी कोरोनाच्या काळात सेवा बजावणा-या कोरोना वाॅरीयर्स माळेगाव पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस नाईक रमेश नागटिळक,अमोल खांडेकर,होमगार्ड विकास मदने यांचा सन्मान करण्यात आला.
  यावेळी कुरबान बागवान,रियाज शेख,डाॅ. ठोकळ,सतिश ठोंबरे,दादा सोनवणे,आसिफ शेख, उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत सदस्य संतोष भोसले,केशव भोसले,अजित भोसले विश्वास भोसले,संग्राम भोसले,अजिंक्य भोसले,वैभव भोसले,मयुर भोसले,विराज भोसले,सागर बनसोडे यांनी केले होते.

Post a Comment

Previous Post Next Post