बारामती दि २७ : बारामती शहरातील एका युवकाची काल रात्री कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. मात्र आज त्या युवकाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने बारामतीकरांना दिलासा मिळाला आहे . प्रत्यक्षात कोणताही प्रवास किंवा कोणताही थेट संपर्क नसताना या युवकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने बारामतीकर धास्तावले होते .या युवकाला कोरोनाची बाधा झाल्याचे प्रशासनाने मंगळवारी जाहीर केले होते. या संदर्भात तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी सांगितले की शहरातील खासगी हॉस्पिटलने घेतलेल्या चाचणीत काही जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते मात्र या तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता तसेच या तरुणास कोणतीही लक्षणे दिसत नव्हती त्यामुळे त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनास धक्काच बसला होता .अर्थात अहवाल येण्यासाठी उशीर होत असल्याने प्रशासनाने त्याची मंगळवारी पुन्हा चाचणी घेतली त्याचा अहवाल सकाळी निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे हा बारामतीकरांना दिलासाच आहे.
मंगळवारी पॉझिटिव्ह आलेल्या तरुणाची कोरोना चाचणी निगेटिव्ह . सा.बारामती दर्पण
baramati darpan
0
Comments
Post a Comment