बारामती दि २७ : बारामती कृषिउत्पन्न बाजार समितीच्या आवारातील जनावरे बाजार गुरूवार दिनांक २८ मे पासून सुरू होणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल (दादा )खलाटे यांनी दिली.कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे गेली दोन महिन्यांपासून जनावरे बाजार बंद होता. जिल्हा उपनिबंधकांनी नुकतीच जनावरे बाजार सुरू करण्यास बाजार समितीस परवानगी दिली असून शेतकऱ्यांनीही सोशल डिस्टन्सचे पालन करून बाजार समितीस सहकार्य करण्याचे आव्हान सभापती खलाटे यांनी केले आहे.
बारामतीतील जनावरे बाजार गुरुवार पासून सुरु - अनिल खलाटे सा. बारामती दर्पण
baramati darpan
0
Comments
Post a Comment