सचिन वाघ   
                 लाटे:   कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्याकरिता शेतकऱ्यांची खत दुकानात गर्दी होऊ नये या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून तालुक्यात शेतकऱ्यांना गटामार्फत थेट बांधावरच खतांचे वाटप करण्यात येत आहे.याचाच भाग म्हणून बारामती तालुक्यातील बजरंगवाडी येथे  कृषीविभागाकडून खरीप हंगामासाठी विविध खतांचे वाटप बांधावरच करण्यात आले बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल (दादा) खलाटे,सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक नानासो खलाटे, यांच्या हस्ते बजरंगवाडी येथील जय हनुमान शेतकरी गट व श्रीहरी शेतकरी गटातील शेतकऱ्यांना खताचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी लाटे येथिल कृषी सहाय्यक राहुल भोसले गटाचे अध्यक्ष हनुमंत साबळे ,जमादार साळुंखे, नवनाथ साबळे ,यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.गटातील अध्यक्ष व सचिव यांनाच खत खरेदी करता येईल असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم