बारामती : तालुक्यातील मुर्टी येथे एक कोरोना रुग्ण आढळून आला आहे .संक्रमित रुग्ण हा मुंबई येथून मूर्टी येथे आला असल्याची माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली आहे .बारामती येथील हा अकरावा कोरोना रुग्ण ठरला आहे. त्यामुळे मुर्टी महसूली गावाची सीमा ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा व वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. बारामती येथील नागरिकांना आवाहान करण्यात येत आहे की आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व लाॅकडॉऊन दरम्यान कुठल्याही परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नये व प्रशासकीय यंत्रणेस सर्वे कामी व कायदा व सुव्यवस्था कामे सहकार्य करावे अशी विनंती प्रांताधिकारी यांनी केली आहे.
बारामती तालुक्यातील मुर्टी येथे सापडला कोरोना रुग्ण. - बारामती दर्पण
baramati darpan
0
تعليقات
إرسال تعليق