माळेगाव प्रतिनिधी-
ग्रामविकास अधिकारी एस बी साळुंखे यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे माळेगाव व परिसरातील सुमारे 262 जणांना शरद भोजन थाळीचा लाभ मिळणार आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या वतिने ज्या नागरिकांना रेशनवर धान्य मिळत नाही व जे राशन पासुन वंचित आहे अशांना शरद भोजन योजना सुरू केली आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींनी एकच गर्दी केली होती होती.ग्रामपंचायतीकडे 328 जणांनी अर्ज केले होते.यापैकी 262 जण शरद भोजन योजनेसाठी पात्र ठरले आहेत.
या योजनेचा लाभ सर्वांना मिळाला पाहिजे यासाठी गेली 4-5 दिवस ग्रामविकास अधिकारी एस बी साळुंखे यांनी व इतर कर्मचारी यांनी मोठे परिश्रम घेतले.पात्र झालेल्या 262 जणांचे तातडीने पोस्ट ऑफिसमधे खाते काढले व ओळखपत्र देखील दिले.लवकरच या 262 जणांना शरद भोजन योजना अंतर्गत दोन वेळा मोफत जेवण मिळणार आहे.
दरम्यान गावातील गरजूंना याचा लाभ मिळावा यासाठी खुप प्रयत्न केले.तालुक्यातील मोठे असलेले गाव व लाॅकडाऊन असल्याने लाभार्थी निवड करणे अवघड झाले.मात्र 262 जणांना हा लाभ मिळणार असल्याने समाधान वाटते आहे असे ग्रामविकास अधिकारी एस बी साळुंखे यांनी सांगितले.

إرسال تعليق