सचिन वाघ :
बारामती दर्पण:
अर्मोक्स फिल्म्स आणि यंत्रणा फिल्म्स निर्मित , सुप्रीम मोशन पिक्चर्स आणि सत्यम ज्वेलर्स प्रस्तुत ‘संगी’ हा हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुमित कुलकर्णी यांनी केले असून लेखन बारामतीचे सुपुत्र विजयसिंह सर्जेराव थोपटे यांचे आहे. रोहन भोसले, अरुण प्रभुदेसाई, पिंटू सॉ, मोनिका प्रभुदेसाई, प्रतीक ठाकूर, सुमित कुलकर्णी हे 'संगी'चे निर्माते आहेत. तर लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि राहुल किरणराज चोप्रा सहनिर्माते आहेत. यात शरीब हाश्मी, संजय बिष्णोई, श्यामराज पाटील, विद्या माळवदे आणि गौरव मोरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
संगी’ या बहुप्रतीक्षित हिंदी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या टिझरने आधीच प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली होतीच आणि आता ट्रेलरमधून चित्रपटाचा मनोरंजक प्रवास अधिकच समोर आला आहे. हलकीफुलकी कथा, मैत्रीतील गोडवा, आणि हास्याचा अफाट डोस यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयाला भिडेल, हे नक्की!
संगी म्हणजेच मैत्री... त्यामुळे याचे कथानक मैत्रीभोवती फिरणारे आहे. मात्र पोस्टरमध्ये तीन मित्र दिसत असतानाच काही नोटाही दिसत आहेत. त्यामुळे आता पैसे आणि मैत्री यांचा एकमेकांशी काय संबंध असणार हे जाणून घेण्यासाठी १७ जानेवारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
या चित्रपटाचे लेखन बारामती तालुक्यातील थोपटेवाडी गावचे रहिवाशी असलेले ले.कर्नल विजयसिंह सर्जेराव थोपटे (से.नि.) यांनी केले आहे. थोपटे यांनी देशासाठी २५ वर्ष योगदान दिले आहे तसेच आता चित्रपट क्षेत्रात देखील योगदान देत आहेत. थोपटेवाडी सारख्या एका छोट्या खेडेगावातून कोणतीही पार्शभुमी नसताना हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये ते आज नावारूपाला येत आहेत याचा सर्वांना अभिमान आहे. यापुढील काळात देखील त्यांचे अनेक नवनवीन चित्रपट आपल्याला पहावयास मिळणार आहेत.
एकंदरच हलकीफुलकी, हास्य आणि मनोरंजनाने भरलेली कथा असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवणारा असेल, हे नक्की !
" 'संगी' हा फक्त एक चित्रपट नाही तर प्रत्येकाच्या आयुष्यातील हास्यरसाचा अनुभव आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट असला तरी घरातील प्रत्येकाने हा चित्रपट आपल्या मित्रपरिवारासोबत आवर्जून पहावा . 'संगी' विनोदी चित्रपट असला तरी यात भावनाही दडलेल्या आहेत."
Post a Comment