बारामती दर्पण प्रतिनिधी
पणदरे:
निरा बारामती रस्त्यावर खामगळ पाटी नाजिक ट्रॅक्टर व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. विश्वास गणपत राजगुरू (वय:२१) रा. सोनकसवाडी ता:बारामती असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नावे आहे. विश्वास राजगुरू आपल्या दुचाकी वरून निरेच्या दिशेने जात होता तर ट्रॅक्टर हा नीरा बाजूकडून बारामतीकडे जात होता. समोरा समोर ट्रॅक्टर व दुचाकीचा अपघात झाल्याने या युवकाचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती वडगाव निंबाळकर पोलिसांनी दिली आहे.
إرسال تعليق