बारामती दर्पण प्रतिनिधी
को-हाळे बुद्रुक:
   को-हाळे बुद्रुक येथील खोमणेवाडी विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या चेअरमन पदी कल्याण सुरेश माळशिकारे तर व्हाईस चेअरमन पदी दिलीप बापूराव साबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
  खोमणेवाडी विविध कार्यकारी सोसायटीची सभा शुक्रवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी संस्थेच्या सभागृहात पार पडली यावेळी या निवडी बिनविरोध करण्यात आल्या यावेळी केसकर डॉक्टर,रोहिदास कोकणे, निवडणूक निर्णय अधिकारी धायतोंडे साहेब यांच्यासह संस्थेचे संचालक व सभासद उपस्थीत होते. निवडीनंतर नवनिर्वाचित चेअरमन कल्याण माळशिकारे बोलताना म्हणाले की संस्थेने सभासदांचा विश्वास कायम जिंकला आहे, यापुढेही तो कायम राहील यात शंका नाही. बागायती भागात ही संस्था कार्यरत असल्याने एकरी ऊस उत्पादन वाढवण्यासाठी संस्थेमार्फत ऊस कार्यशाळा घेऊन सभासद शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर व्हाईस चेअरमन दिलीप साबळे यांनी संस्था सभासद शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम राहील असे सांगितले.

Post a Comment

أحدث أقدم