बारामती दर्पण प्रतिनिधी
सोमेश्वर नगर:
सोमेश्वर नजीक सहा फाटा या ठिकाणी मोटारसायकल झाडाला धडकून एका शाळकरी विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक विद्यार्थी जखमी झाला आहे. ही घटना आज सकाळी घडली असून या अपघातामध्ये सोरटेवाडी येथील प्रथमेश महादेव गायकवाड(वय:१७) या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे तर त्याचा मित्र मयूर सोरटे हा जखमी झाला आहे. मयूर सोरटे याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती वडगाव निंबाळकर पोलिसांनी दिली आहे.
   सविस्तर हकीकत अशी की प्रथमेश गायकवाड व मयूर सोरटे हे दोन्ही विद्यार्थी सकाळी आपल्या दुचाकीवरून सोरटेवाडी येथील शाळेत निघाले होते. शाळेत जात असताना त्यांची दुचाकी झाडावर धडकल्याने अपघात झाला. या अपघातात दोघे जखमी झाले होते. त्यांना सोमेश्वर येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी हलविले असता डॉक्टरांनी प्रथमेश गायकवाड हा उपचारापूर्वीच मयत झाला असल्याचे घोषीत केले तर मयूर सोरटे हा जखमी असल्याने त्याच्यावर उपचार सुरू केले. या घटनेने सोरटेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

Post a Comment

أحدث أقدم