बारामती दर्पण प्रतिनिधी
सोमेश्वरनगर:
दरवर्षीप्रमाणे वाघळवाडी येथे उत्साहात साजरी होणारी शिवजयंती यावर्षी ही मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. १९ फेब्रुवारी रोजीच्या या शिवजयंती उत्सवात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती अंबामाता ग्रामस्थ मंडळाने दिली आहे. 
    श्रीमंत अंबामता ग्रामस्थ मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून १६ फेब्रुवारी रोजी किल्ले सिंधदुर्ग येथे अंबामाता मंदिर येथून प्रस्थान करण्यात येणार असून ज्योतीची मशाल घेऊन सर्व शिवरायांचे मावळे धावत ज्योत गावात घेऊन येणार आहेत. 
       ज्योतीचे आगमन झाल्यावर १९ फेब्रुवारी रोजीची रॅली चे आयोजन निरा ते सोमेश्वर कारखाना येथे शिवरायांच्या अश्वरूढ पुतळ्यास पुष्पहार घालून वाघळवाडी येथे ज्योतीचे आगमन होणार आहे. तसेच २० फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिर तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم