वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन आणि बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत केलेले सर्व गुन्हे उघडकीस 
   
बारामती दर्पण प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर:

   वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत तसेच बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत क-हा नदीपात्रातील बंधाऱ्याची दरपे चोरी करणारी टोळी वडगाव निंबाळकर पोलिसांनी गजाआड केली आहे.
दिनांक 14/08/2021 ते 2/10/2021 या कालावधीतज मौजे बाबुर्डी-लोणीभापकर गावचे हददीत तसेच बारामती तालुका पो.स्टे हद्दीत जळगाव सुपे गावचे हद्दीत क-हा नदीचे पात्रात बंधा-यावरील बर्गे (दरपे) चोरी करून नेलेवरुन श्री.शीवराज माणिक चांदगुडे  (रा.का-हाटी ता.बारामती जि.पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 381/2021 भादवि 379, 34 प्रमाणे दि. 06/10/2021 रोजी गुन्हा दाखल झालेला होता. 
सदर गुन्हयाचे तपासाचे अनुषंगाने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि.सोमनाथ लांडे व त्यांचे तपास पथकाने तांत्रिक माहीती व गोपनीय माहीतीच्या आधारे सदर गुन्हयातील संशयित आरोपी नामे रूपेष मोहन इनामके (वय 21 रा मु.शेरेचीवाडी पो.बाबुर्डी ता बारामती जि पुणे )यास कोल्हापुर येथुन ताब्यात घेऊन त्याचेकडे सदर गुन्हयाचे अनुषंगाने सखोल चैकषी केली असता त्याने त्याचे साथीदार पांडुरग बंडाजी लडकत (वय 30 रा मु.शेरेचीवाडी पो.बाबुर्डी ता बारामती जि पुणे) विवेक प्रकाष जराड (वय 23 मुळ रा मु.पो. उंडवडी कडेपठार ता बारामती जि पुणे, सध्या रा बुरूड गल्ली बारामती ता बारामती जि पुणे)   अभिजित धोंडिबा तांबे (वय 23 रा मु.पानसरेवाडी, पो.सुपे ता बारामती जि पुणे) रियाज दिलावर सय्यद (वय 28 रा रिसे-पिसे पो. राजुरी ता पुरंदर जि पुणे) मोहन रघुनाथ इनामके (रा शेरेचीवाडी पो.बाबुर्डी ता बारामती जि पुणे)  तेजस जालिंदर जमदाडे (रा. पानसरेवाडी पो.सुपे ता बारामती) (विधीसंर्घष बालक) यांचे मदतीने सोबत क-हा नदीचे पात्रातील बाबुर्डी ता.बारामती येथील व जळगाव सुपे ता.बारामती येथील बंधा-याचे बर्गे चोरी केलेचे कबुली  दिली आहे. या सर्व आरोपींना गुन्हयाचे पुढील तपासकामी आरोपींना तात्काळ अटक करण्यात आलेली आहे. 
सदरची कामगिरी ही डॉ.अभिनव देशमुख  पोलीस अधीक्षक,पुणे ग्रामीण, मिलिंद मोहिते अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग,  गणेष इंगळे उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती उपविभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी स.पो.नि.सोमनाथ लांडे तसेच पोलीस उपनिरीक्षक गणेश कवितके, सलीम शेख, योगेष शेलार यांचे सह पोलीस अंमलदार बापुसाहेब पानसरे, हिरालाल खोमणे, ज्ञानेश्वर सानप, पोपट नाळे, अमोल भुजबळ, किसन ताडगे, सचिन दरेकर, शेंडकर यांनी केेलेली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस नाईक बापुसाहेब पानसरे हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post