संभाजी नाना होळकर यांची बँक प्रतिनिधी म्हणून निवड

बारामती दर्पण प्रतिनिधी:
सोमेश्वर नगर:

बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी तुषार सुरेशराव माहुरकर व तज्ञ संचालक पदी अजय नथूराम कदम तसेच बँक प्रतिनिधी म्हणून संभाजी नाना होळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
आज झालेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला . यावेळी कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर संचालक अभिजित काकडे ,ऋषिकेश गायकवाड, सुनील भगत, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. बारामती तालुका अध्यक्ष संभाजी नाना होळकर यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी सुचवलेल्या या नावाची घोषणा केली.

Post a Comment

أحدث أقدم