बारामती दर्पण प्रतिनिधी
मोरगाव :
मोरगाव ता . बारामती येथील ग्रामपंचायत उपसरपंच पदी संदीप लक्ष्मण नेवसे यांची नुकतीच निवड करण्यात आली . उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाली .
मोरगाव येथील ग्रामपंचायत उपसरपंच वैशाली पालवे यांचा ठरल्याप्रमाणे निर्धारीत कार्यकाळ पुर्ण झाल्याने राजीनामा दिला होता . हा मंजुर झाल्यानंतर या रिक्त पदासाठी निवड प्रकीया नुकतीच पार पडली . ही निवडीसाठी बोलवलेल्या सभेचे अध्यक्ष सरपंच निलेश केदारी होतो . यावेळी सदस्य पोपट तावरे , ग्रामसेवक मोरेश्वर गाडे व इतर सदस्य उपस्थित होते
. उपसरपंच पदासाठी केवळ एकमेव अर्ज आल्याने संदीप ( संतोष ) लक्ष्मण नेवसे यांची बिनविरोध निवड झाली . यावेळी सरपंच निलेश केदारी , माजी सरपंच पोपट तावरे , विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनी नेवसे यांचा सत्कार करून अभीनंदन केले . यानिवडीनंतर बोलताना नेवसे यांनी सांगितले की , जनतेने दाखविलेला विश्वास सार्थ दाखवुन गावातील विकास कामांसाठी पाठपुरावा करणार आहे .
إرسال تعليق